डोंबिवली ( शंकर जाधव ) : सर्पदंशाने मावशी - भाचीचा मृत्यू झाल्याने डोंबिवलीतील पालिकेच्याशास्त्रीनगर रुग्णालयातील आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. अनेक वर्षांपासून हे रुग्णालय गरिबांकरता असले तरी रुग्णालय पुढील उपचाराकरता ठाण्यातील रुग्णालयाची दिशा दाखवली जाते. या दोघींचा उपचाराकरता दुसऱ्या रुग्णालयात का जाण्याचा सल्ला देण्यात आला असा प्रश्न डोंबिवलीकर विचारीत आहे. दोन चार वर्षाआधी डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथे एका लहान मुलीला साप चावल्याने याच रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्या मुलीचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकांनी आणि रिपब्लिकन सेनेने रुग्णालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले होते.या याआधीच्या घटनेमुळे आता पालिकेचे रुग्णालय उपचार करू शकत नाही का असा प्रश्न विचारीत येत्या मंगळवार 7 तारखेला डोंबिवलीकरांचा निषेध मोर्चा निघणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार गट) डोंबिवली शहर अध्यक्ष भाऊ पाटील यांनी डोंबिवलीकरांना आवाहन केले आहे की यां निषेध मोर्च्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.याबाबत पाटील म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला स्थापन होऊन 42 वर्षे पूर्ण झाली पण आज पर्यंत महानगरपालिका एक सुसज्ज आरोग्य व्यवस्था उभारू शकली नाही, डोंबिवली येथे शास्त्री नगर व कल्याण येथे रुक्मिणी बाई रुग्णालय आहेत पण तिथे कोणतीही सुविधा नाही , व्हेंटिलेटर नाही , ई सी जी , एम आर आय , सिटी स्कॅन , आय सी यू सारख्या सुविधा नसल्या मुळे रुग्णांना ठाणे व मुंबई ला जावे लागते , सिरीयस पेशंट ला वेळेत उपचार न मिळाल्या मुळे शिळफाटा ट्रॅफिक मध्येच जीव सोडत आहे. त्या निष्पाप मुलींचा जीव गेला उद्या त्या ठिकाणी आपल्या कुटुंबातील कोणी असू शकतो , आपण आपल्या कुटुंबातील व्यक्ती जाण्याची वाट पाहणार का ? नाही ना , तर चला मग या झोपलेल्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना आणि मृत नगरपालिकेला जागे करूया . निषेध करण्यासाठी साठी एकत्र येऊया. हा मोर्चा डोंबिवली पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते डेअरी ते शास्त्रीनगर रुग्णालय असा निघणार आहे. हा मोर्चा सर्वपक्षीय सहभागासह आयोजित करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
