डोंबिवली ( शंकर जाधव ) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे १४वे ऐक दिवसीय साहित्य व काव्य संमेलन कल्याण जवळील कोन गावात म्हात्रे सभागृहात संपन्न झाले.
त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार सदाशिव तथा बापू वैद्य यांना प्रतिष्ठेचा सावित्रीबाई फुले यांचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रीय कवी डॉ. जयकुमार घुमटकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार वैद्य यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर संमेलन आठगांव विद्यालय झाले. त्यावेळी अनेक कवी आणि साहित्यक उपस्थित होते.तसेच अग्रवाल काॅलेजचे संचालक पंडित ,कोन ग्रामपंचायतीच्या सरपंच सह शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळ व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
