Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मनोज रानडे यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला

ठाणे - जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांची बदली जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली असून, त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे (भा.प्र.से) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

रोहन घुगे यांनी दि. ८ ऑक्टोबर, २०२५ रोजी मध्यान्होत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे या पदावरून कार्यमुक्त होताना मनोज रानडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. मनोज रानडे यांनी दि. १० ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारनंतर जिल्हा परिषद ठाणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.

ठाणे जिल्हा परिषदेने रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आता या वाटचालीला अधिक वेग देत नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाचा ध्यास कायम ठेवू,असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर व अतिरिक्त कार्यभार, जिल्हा परिषद ठाणे मनोज रानडे यांनी केले आहे.

रोहन घुगे यांच्या कार्यकाळातील कामगिरी
रोहन घुगे यांनी १९ जून २०२४ मध्ये जिल्हा परिषद ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास आणि प्रशासन या क्षेत्रात ठाणे जिल्हा परिषदेत उल्लेखनीय बदल घडवून आणले. त्यांनी शासनाच्या “Door Step Delivery”, “दिशा उपक्रम”, ई-ऑफिस प्रणाली, ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी, ई-कामवाटप आणि AI आधारित प्रशासन या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे जिल्हा प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यावर भर दिला. तसेच मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेने उत्तम कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, ही त्यांची मोठी कामगिरी ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |