भाजपच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी विचारला पालिकेच्या पाणी पुरवठा अभियत्याला जाब
डोंबिवली ( शंकर जाधव) : डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली, ठाकूरवाडी, विजयनगर, राम मंदिर परिसर तसेच एकविरा नगर येथे नागरिकांना पाणीटंचाई व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत सोमवार 26 तारखेला येथील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी डोंबिवली शहर उपाध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिमेकडील 'ह' प्रभाग क्षेत्र पाणी पुरवठा विभाग अभियंता उदय सूर्यवंशी यांना नागरिकांनी जाब विचारला.यावेळी उपाध्यक्ष पाटील यांनी सूर्यवंशी यांना निवेदन देत या भागात लवकरात लवकर पाणी पुरवठा योग्य दाबाने करा असे सांगितले.
भारतीय जनता पार्टी सदैव जनतेच्या पाठीशी उभी असून, नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी सतत प्रयत्नशील आहे असे यावेळी उपाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
