मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त
डोंबिवली ( शंकर जाधव) : मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर परतीचा पाउस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली, जमीनी खरवडून गेल्या, जनावरे दगावली, घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यामुळे संसार वाहून गेला. पूरग्रस्त या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचे पॅकेज जाहीर केले.
कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी बळीराजाला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सुपूर्त केला.
