Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

१८ हजार दुबार आणि १५ हजार बोगस नावे वगळा ... मनसेचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

बेलापूर विधानसभेतील बोगस आणि दुबार नावांची संपूर्ण यादी दिली ...

जुईनगर मधे मतदाराच्या नावासमोर राहण्याचा पत्ता "सुलभ शौचालय"
 
निवडणूक अधिकाऱ्यांना पुराव्यासह मनसे ने दाखवून दिले ...

नवी मुंबई : साधारण १५ हजार दुबार आणि पत्ता सापडत नसलेली १८४०३ बोगस नावांची यादी आज पुन्हा एकदा मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी बेलापूर निवडणूक निर्णय अधिकारी विकास गरुडकर यांना दिली. एक वर्षापूर्वी ही यादी दिलेली असताना देखील अजून त्यावर ठोस कारवाई का केली नाही असा जाब मनसेने निवडणूक निर्णय अधिकारी यांना विचारला. त्यावर आता पर्यंत साधारण ४ हजार ते ५ हजार दुबार नावे वगळली आहेत आणि इतर दुबार नावांवर कार्यवाही चालू असल्याची माहिती विकास गरुडकर यांनी दिली. जी वगळलेली नावे आहेत तसेच नवीन समाविष्ट नावे याची यादी देताना पत्ता व कारण याची माहिती देत नाहीत. ती माहिती देण्याची सुद्धा मागणी मनसेने केली. मृत दाखला न मिळाल्याने मृत व्यक्तींची नावे वगळली जात नाहीत त्यासाठी महानगरपालिकेकडून मृत दाखला घेऊन नावे वगळावी ही सूचना ही विकास गरुडकर यांनी तात्काळ मान्य केली.

पत्ता सापडत नसलेली १५ हजार बोगस नावांची छाननी होणे आवश्यक असल्याचे मनसेने मागणी केली असता. या यादीतील मतदारांचा वास्तव्याचा पुरावा ग्राह्य धरून योग्य पंचनामा करून अशी नावे वगळण्याची कार्यवाही करू असेही निवडणूक अधिकारी यांनी गजानन काळे यांना माहिती दिली. बेलापूर विधानसभा मधील यादी क्रमांक १४८ मधील अनुक्रमांक ५१ च्या मतदाराचा पत्ता हा सुलभ शौचालय आहे. हा घोळ कोणत्या अधिकाऱ्यांनी केला असा सवाल गजानन काळे यांनी केला. १ नोव्हेंबर पासून बोगस नावे वगळण्याची कामे प्राधान्याने सुरू होत असल्याची माहिती निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी दिली. मनसेचे Booth Level Agent (BLA) आणि गटअध्यक्ष हे जोमाने काम करून मतदार यादी शुद्धीकरण करतील अशी ग्वाही गजानन काळे यांनी दिली. 

मनसेच्या या शिष्टमंडळात मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, महिला सेना उपशहरअध्यक्ष अनिथा नायडू, मनसे विभागअध्यक्ष अमोल आयवळे, योगेश शेटे, रोजगार सेना शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, उपविभागअध्यक्ष राजेंद्र खाडे, विद्यार्थी सेना उपशहरअध्यक्ष प्रतिक खेडकर, महिला सेना विभागअध्यक्ष शीतल दळवी हे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |