डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
काही दिवसांपूर्वी याआधी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांनंतर माजी नगरसेवक सदाशिव शेलार हे एकमेव होतें ज्याच्या भूमिकेवर सर्व राजकीय पक्षाचे लक्ष होते.
शेलार यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर आता डोंबिवलीत काँग्रेसला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या चार नगरसेवकांच्या प्रभागात कोणता उमेदवार उभा करावा असा प्रश्न नक्कीच पडला असेल.
