मुंबई, दि. ३० : बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची शौर्या अंबुरे हिने उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने 100 मीटर हर्डल्स शर्यतीत 13.73 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले.
क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शौर्या अंबुरे हिच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अंबुरे कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचेही अभिनंदन केले.
ठाण्याची शौर्या अंबुरे हिने महाराष्ट्राचा क्रीडागौरव वाढविला आहे. मुंबई विमानतळावर आगमनानंतर क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे यांच्या निर्देशानुसार क्रीडा विभागाच्यावतीने तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
