सामाजिक कार्यकर्त्या पुजा चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली मागणी.
उरण दि १२(विठ्ठल ममताबादे ) : आज कित्येक दिवस उरण तालुक्यातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे रस्त्याची दुरावस्था झालेली सर्वांना दिसत आहे. या ठिकाणी जेष्ठ नागरिक असलेल्या रुग्णांच्या गाड्या, ॲम्बुलन्स यांची फार मोठी वर्दळ बघावयास मिळते.तर या रस्त्यालाच लागून थोड्याच अंतरावर दोन मोठी नामांकित विद्यालय आहेत. या विद्यालयात नेहमी हजारो विद्यार्थी येत जात असतात. या सर्वाना या रस्त्यावर चालताना खुप त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरावस्था मुळे येथे कित्येक वेळा अपघात देखील झालेले आहेत.तसेच या रस्त्याच्या किनाऱ्याला लागून मोठा नाला आहे. या नाल्याला कोणत्याही प्रकारची कठडा नसल्याने एखादे वाहनाचा तोल गेल्यास नाल्यात पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे या नाल्याला कठडा बांधण्यात यावा अशी मागणी महिला सामाजिक कार्यकर्त्या पूजा चव्हाण यांनी केली आहे.
लहान मुले, विद्यार्थी ही देशाची भावी पिढी आहे देशाचे भवितव्य आहे या रस्त्याच्या दुरस्तेमुळे या लहान मुलांना जीव मुठीत घेऊन या रत्यावरून प्रवास करावा लागत आहे. तर या ठिकाणी भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही.तसेच या पुढे या रस्त्यावर कोणतीही अपघात दुर्दैवी घटना घडल्यास याची सर्व जबाबदारी ही या संबंधित प्रशासनाची राहणार आहे.
प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी पत्रकार उत्कर्ष समितीच्या उरण तालुका अध्यक्षा पूजा चव्हाण यांनी एका लेखी निवेदनात केली आहे.सदरचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्यधिकारी यांना दिले आहे.