ठाणे,दि.०८:- ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकांची आढावा बैठक दि.०७ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली.
या बैठकीस भारतीय रिझर्व्ह बँक, नाबार्ड, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अभिषेक पवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, RSETI संचालक, ठाणे, सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, राज्य शासनाच्या विविध महामंडळांचे प्रतिनिधी तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. प्रामुख्याने वार्षिक कर्ज योजना (ACP) 2025-26, शासकीय प्रायोजित योजना (PMEGP, CMEGP, PM Vishwakarma, PMFME, Stand-Up India, Mudra), तसेच आर्थिक समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजना (PMJJBY, PMSBY, APY) या विषयांवर चर्चा केंद्रित होती. तसेच पीएम स्वनिधी योजना, RSETI व FLC च्या कामकाजाचा आढावा आणि DFS व RBI तर्फे राबविण्यात आलेल्या निष्क्रिय ठेवींसंदर्भातील जनजागृती मोहिमेवर देखील विचारविनिमय झाला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व बँकांना निर्देश दिले की, प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढावीत, प्राधान्य क्षेत्र कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, तसेच सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा.
