कल्याण ( शंकर जाधव) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकी होणार असून मुंबई व ठाणे महानगरपालिकेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे राजकीय पक्षाचे लक्षलागले आहे. आपला महापौर बसवा याकरता आपल्या पक्षाची उमेदवार निवडणूक आणण्याकरता भाजपा प्रदेशअध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ऑपरेशन लोटस सुरु केले.
तर शिवसेना ( शिंदे गट ) त भाजपचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी प्रवेश केला. याची दाखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. केंद्रात व राज्यात महायुती असतानाही स्थानिक पातळीवरील निवडणुकित आपलाच झेंडा असावा याकरता जोरदार प्रयत्न सुरु आहे.
मात्र ठाकरेच्या शिवसेनेत भाजपातून कल्याण युवा मोर्चा सचिव योगेंद्र भोईर यांनी शनिवार २२ तारखेला मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला.
