Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शिवसंकल्प समालोचक असोसिएशन तर्फे रामचंद्र म्हात्रे विद्यालयास ब्ल्यू टूथ स्पीकर प्रदान आणि असोसिएशनच्या जर्सीचे अनावरण...

उरण दि २२ ( विठ्ठल ममताबादे ) : सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या तथा समालोचन, निवेदनातून समाजाची जनजागृती करणाऱ्या आणि आजतागायत आपल्याला मिळणाऱ्या मानधनातून काही अंश समाजासाठी वापरून विद्यार्थिनींना शैक्षणिक अर्थसहाय्य, अपंग, पीडित, तसेच वैद्यकीय मदत, शाळांना मदत, असे ५० हून अधिक सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन च्या वतीने आज रामचंद्र विद्यालय आवरेला ब्ल्यू टूथ स्पीकर प्रदान आणि असोसिएशन ची जर्सी अनावरण असा दुहेरी कार्यक्रम रामचंद्र म्हात्रे विद्यालय, आवरे येथे पार पडला.

सदर कार्यक्रमासाठी ज्यांच्या माध्यमातून स्पीकर साठी धनराशी देण्यात आली असे ज्येष्ठ समाजसेवक मनोहर पाटील (माऊली) वहाळ, तसेच ज्यांच्या माध्यमातून असोसिएशन च्या ३३ सभासदांच्या अंगावर जर्सी रुपी वस्त्रालंकार देण्यात आला असे युवा उद्योजक नंदकुमार गावडे (भोम ),रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर, शिवप्रेमी प्रा. शिक्षक कौशिक ठाकूर, असोसिएशनचे अध्यक्ष नितेश पंडित, उपाध्यक्ष श्याम ठाकूर, सचिव सुनिल वर्तक, खजिनदार जिवन डाकी, सहसचिव विद्याधर गावंड, स्वप्नील पाटील, पिंट्या घरत, मनीष चिर्लेकर आदी सदस्य आणि विद्यालयाचे सर्व शिक्षकवर्ग आणि कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मनोहर पाटील यांनी असोसिएशनच्या कार्याची स्तुती करून या विद्यालयाची आणखी एक गरीब, गरजू विद्यार्थिनीस शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याचे आणि या असोसिएशनला नेहमी साथ देण्याचे अभिवचन दिले. तर विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर यांनी असोसिएशनच्या प्रत्येक सभासदाचे विशेष कौतुक करून कार्याची प्रशंसा केली.

कार्यक्रम प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत शिक्षक शेखर पाटील यांनी तर प्रास्ताविक असोसिएशनचे सचिव सुनिल वर्तक यांनी आणि अध्यक्ष नितेश पंडित यांनी असोसिएशन च्या कार्याचा विस्तृत लेखाजोगा मांडताना पुढील ध्येय धोरण विषद केले. शेवटी मनोहर पाटील यांचे चिरंजीव उत्तम तबला वादक केवल पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना फळे वाटप करून विद्याधर गावंड यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |