डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण लोकसभा शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आणि आमदार राजेश मोरे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच अनिल म्हात्रे व संगिता म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्र. ११५ येथील नांदिवली बामन देव मंदिर परिसरातील रोडपर्यंत कॉक्रिटकरण व गटार कामाकरीता शासनातर्फे २५ लाख निधी मंजूर झाला.
या विकास कामाचे भूमिपूजन नुकतेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना पदाधिकारी प्रकाश म्हात्रे, अर्जुन पाटील आकाश देसले, ओम लोके, माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे उपस्थित होते.
यावेळी आमदार राजेश मोरे म्हणाले सतत इथल्या परिसरातल्या नागरिकांसाठी आपल्याला काय देणं आहे, त्यांच्या काय गरजा आहेत हे ओळखून सतत महापालिकेच्या माध्यमातून असेल, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून असेल, आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून असेल सतत पाठपुरावा करून हे काम हे सर्व प्रतिनिधी करून घेतात मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो. येथील सोसायटीचा पाण्याचा प्रश्न संपलेला आहे. आमचे सर्व कार्यकर्ते नागरिकांसाठी काम करत आहेत.
