डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील 100 मीटर अंतरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे.पालिका आयुक्त अभिनय गोयल आणि उपायुक्त बोरकर व 'ग' प्रभाग क्षेत्र आयुक्त भरत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाला हटाव कारवाई करण्यात आली. पथकप्रमुख अरुण जगताप व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. मधुबन गल्ली, उर्सेकर वाडी, रामनगर तिकीट घराजवळील परिसरात कारवाई करण्यात आली.या कारवाईत फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. रस्त्याच्या कडेला बसून नागरिककांना चालण्यास अडचण आणणाऱ्या फेरीवाल्याचे सामान जप्त करण्यात आले
