डोंबिवली ( शंकर जाधव ) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपा कार्यालयात मिलींद म्हात्रे व त्यांच्या पत्नी ऍड.कविता मिलिंद म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.त्याच बरोबर ठाकरेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश केला.
यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब आणि स्थायी समितीचे माजी सभापती दिपेश म्हात्रे आदी उपस्थित होते. मनसेतील गणेश यादव आणि समीर पाटील यांनी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ओमकार नाटेकर, सचिन कुर्लेकर, हरिश्चंद्र परडकर यांनीही भाजपात प्रवेश केला.
यावेळी भाजपा प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्यांचे अभिनंदन केले.
