पदमश्री मुरलीकांत पेटकर यांच्या उपस्थितीत झाले कोकण संस्थेच्या पुरस्कारांचे वितरण !
मुंबई : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आयोजित ‘कोकण कला महोत्सव २०२५’ हा भव्य कार्यक्रम संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात आला. हा महोत्सव ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात पारंपरिक नृत्य, रॅम्प वॉक, विविध कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आपली माती, आपली माणसं आणि आपली संस्कृती” ही त्रिसूत्री केंद्रस्थानी ठेवून कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले सहकार महर्षी ज्यांनी कोकणात सहकार आणि स्वयंरोजगार - रोजगार क्षेत्रात भरीव कार्य करणारे ‘वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.’ चे अध्यक्ष व संस्थापक मा. श्री. प्रशांत बबन यादव, तसेच मराठी रंगभूमी, चित्रपट सृष्टीत क्षेत्रात अनेक दशकांपासून आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे बहुआयामी अभिनेते अविनाश नारकर ज्यांनी नैसर्गिक अभिनयशैली आणि दमदार व्यक्तिमत्वामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यांना यावर्षीच्या ‘कोकण रत्न २०२५’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पद्मश्री मुरलीकांत पेटकर (चंदू चॅम्पियन) आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी मंचावर आनंद फाउंडेशनच्या अध्यक्ष अपूर्वा वैद्य, लेखक - दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईचे सचिव दिनकर तावडे, जीवन आनंद चे अध्यक्ष संदीप परब, संस्कार क्लासेसचे अध्यक्ष रमेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच समाज माध्यमांवर प्रभावीपणे कार्य करणाऱ्या मंगेश काकड, आरती जळगावकर, आदिराज सिद्धेश्वर घनघाव आणि युवराज दिंगबर घनघाव, प्रोफेसर संजय अप्प्पन, वीरू महादेव वज्रवाद आदी कंटेंट क्रिएटर्ससाठी - रील टू रियल पुरस्कार देण्यात आला. , ग्रामीण भागातील महिलांसाठी- झिरो टू हिरो पुरस्कार, युवा उद्योजकांसाठी- युथ आयकॉन पुरस्कार, शिक्षण स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनात आदर्श असणाऱ्या गावाला- आदर्श गाव पुरस्कार, निःस्वार्थ भावनेने दीर्घकाळ समाजकार्यात कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्वांना समाज गौरव पुरस्कार, आपल्या कामातून, विचारातून किंवा सर्जनशीलतेतून समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव यू इन्स्पायर पुरस्कार, अशा विशेष पुरस्कारांनी कलाकार आणि विशेष व्यक्तिमत्त्वांचा सन्मान या महोत्सवात करण्यात आला.
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली, चिपळूण सहकारी बँकेच्या अध्यक्षा स्वप्नाजी यादव , मराठी अभिनेता शंतनू रांगणेकर, भारतीय सैन्यातील निवृत्त मेजर आर्चिस सबनीस, विंग कमांडर - वैष्णवी टोकेकर, कन्टेन्ट क्रियेटर सार्थक सावंत, साहिल दळवी, जनजागृती फाउंडेशनचे संस्थापक शरदचंद्र आढाव, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुवर्णा उपस्थित होते. तसेच संस्थेचे व्यवस्थापक आणि कोकण संस्थेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते अक्षय ओवळे आणि कोमल डांगे यांनी केले, तर आभारप्रदर्शन संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मानले.
