Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कल्याणात पोलिसांची अंमलीपदार्थ विरोधी कारवाई; एकाला अटक, 400 कोरॅक्सच्या बाटल्या जप्त

कल्याण (शंकर जाधव) : पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत एका अटक केली असून त्याच्याकडील चार लाख रुपये किमतीचे 400 कोरॅक्सच्या बाटल्या जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवार 1 तारखेला कल्याण मधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

पोलीस उपआयुक्त परिमंडळ -3 अतुल झेंडे यांचे विशेष कारवाई पथक स.पो.नी गायकवाड व त्यांचे पथक हे बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत अमली पदार्थ विरोधी कारवाई कामी गस्त घालत होते. फोर्टीज हॉस्पिटल जवळ एक इसम संशयास्पद आपल्या मोटरसायकल वरून काहीतरी घेऊन जात असताना आढळून आल्याने गस्तीवरील पोलिसांनी हटकले. त्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 400 कोरॅक्सच्या बाटल्या मिळून आल्या.

मोहम्मद मताब अनिस रईस ( 33 वर्ष, रा. 10/बी, गोल्डन प्लाझा,ओल्ड फिश मार्केट,मौलाना शौकत अली चौक, कल्याण पश्चिम) असे अटक केलेल्याचे नाव आहे.त्यांच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्याकडील 4,00,000 रुपये किमतीचे एकूण 400 करेक्टचे बॉटल, 60,000 रुपये किमतीची काळा रंगाचे मोटरसायकल आणि 3660 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |