डोंबिवली ( शंकर जाधव ) घराचे छप्पर कोसळून घरातील समानाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवार 31 तारखेला रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घटना घडली.याची माहिती मिळताच मनसैनिक संदीप ( रमा ) म्हात्रे हे त्या कुटुंबियांच्या मदतीला धावले.म्हात्रे हे त्याच्या घरावरील छप्पर स्व:खर्चाने लावणार असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील मनसे राजगड कार्याल्याच्या पुढे भरत भोईर नगरमधील नागू बाळू म्हात्रे चाळीतील रूम नंबर 2 मध्ये संजय तायडे हे आपल्या कुटुंबियासह राहतात. शुक्रवार 31 तारखेला रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास तायडे यांच्या घरावरील पत्र्याचे अचानक कोसळले.या घटनेत कुटुंबिय सुखरूप असून घरातील सामानाचे नुकसान झाले.अग्निशमन दलाला याची माहीती मिळताच घटना स्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी खबरदारी म्हणून घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढला. यावेळी मनसैनिक संदीप ( रमा ) म्हात्रे हे तायडे कुटुंबियांच्या मदतीला धावले. रात्रीच्या वेळी त्याठीकणी जाऊन त्यांना धीर देत मनसे तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका असे सांगितले.
अग्निशमन दलाचे डोंबिवली पश्चिम अधिकारी पागी यांना विचारले असता ते म्हणाले, तायडे यांच्या घरातील लोखंडी अँगल गंजल्याने पडले. त्यामुळे घरात त्या अँगलला जोडलेल्या सिमेंटचे पत्रे घरात पडले.सुदैवाने जीवितहानी झाली.
