Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

फ्लश टँकमध्ये मतदार ओळखपत्र सापडल्यासंदर्भात माहिती देण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

मुंबई, दि. 27 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी भागात टॉयलेट फ्लश टँकमध्ये निवडणूक मतदार ओळखपत्र सापडल्याबाबत काही मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांत वृत्त व व्हिडीओ क्लिप प्रसारित झाली आहे. प्रसारित व्हिडीओ क्लिपमधून कोणताही बोध होत नाही. हे वृत्त सोशल मीडिया येथून घेऊन प्रसारित करण्यात आले असल्याचा खुलासा संबधित माध्यमांनी केला आहे. 

त्याची चौकशी केली असता घटना कुठे घडली हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ही बातमी व व्हिडीओ क्लिपच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर, २०२५ रोजी डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबर अहवाल (FIR-१२१८/२०२५) अज्ञाताविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तरी देखील या वृत्तातील क्लिपबाबत जर कोणत्याही नागरिकांस माहिती असेल तर त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |