कल्याण ( शंकर जाधव ) : पक्षावर नाराजी नाही पण पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पाच वर्ष एका पदावर काम केल्यानंतर दुसऱ्या कार्यकार्त्याला त्यापदावर काम करण्याची संधी द्यायची असते असे सांगत पोटे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या कल्याण जिल्हाअध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे पत्रकार परिषद सांगितले.काही वेळाने राजाभाऊ पोतकर यांना पक्षाने प्रभारी कल्याण जिल्हाध्यक्षपद दिले.यावर मात्र राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोतकर यांना हे पद पक्षाने दिल्याबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त केली. भाजपात प्रवेश करून पुन्हा काँग्रेस पक्षात घेतले आणि त्यांना जिल्हअध्यक्ष पद देणाऱ्या काँग्रेसची भाजपा झाली आहे का? असा प्रश्न राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना प्रश्न पत्राद्वारे विचारला आहे.
रोहित कदम ( एनओसीवाय जिल्हाअध्यक्ष ), शकील खान ( ब्लॉक अध्यक्ष कल्याण पूर्व),लिओ मेक्कनरॉय (जिल्हा उपाध्यक्ष),प्रवीण साळवे ( ब्लॉक अध्यक्ष कल्याण पश्चिम),मनिषा सरजीने ( ब्लॉक अध्यक्ष कल्याण पूर्व) संकेत लोके (ब्लॉक अध्यक्ष डोंबिवली पूर्व,हेमराज डेरे (काँग्रेस कार्यकर्ता) यांनी खासदार राहुलजी गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्षन सकपाळ यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सचिन पोटे युथ काँग्रेस पासून गेल्या 25 वर्षापासून काँग्रेस पक्षात आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही अनेक निष्ठावंत सहकारी देखील काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू अनेक आंदोलन,मोर्चा आम्ही करत आलो आहोत आणि पक्षाने दिलेला आदेश समजून आम्ही देखील राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाचे जे नवीन ध्येय धोरण आहेत जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही पाळला.त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर नवीन नियुक्त जिल्हाध्यक्ष हे आधी असलेल्या जिल्हाध्यक्षांना भेटून पदभार घेतात अशी परंपरा आहे पण असं न करता त्यांनी एकीकडे जल्लोष करून सचिन पोटे यांनी काँग्रेस सोडावी असा संदेश त्यांना पाठवायचा होता का? आणि ज्या राजाभाऊ पातकर यांनी 2014 ला सचिन पोटे हे काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार असताना सचिन पोटे यांच्या विरोधात बंड करून भाजपामध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसच्या विरोधात पूर्ण वेळ प्रचार केला त्यानंतर ते दहा वर्षे भाजपा पक्षात राहील आणि सत्ताधारी पक्षात असताना देखील भाजपा पक्षाने त्यांना साधे वॉर्ड अध्यक्ष पद देखील दिले नाही.त्याच राजाभाऊ पातकरांना आपण काँग्रेस पक्षात घेतलं त्यावेळी देखील सचिन पोटे यांनी मोठे मन ठेवून त्यांचा प्रवेश नाकारला नाही कारण काँग्रेस पक्षात संघटन वाढीस लागत आहे.त्यावेळी देखील सचिन पोटे यांना विश्वासात घेतलं गेलं नाही.गेल्या अकरा वर्षापासून देशात, महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असताना काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते हे सचिन पोटे यांच्यासोबत जो संघर्ष करत होते.अशा निष्ठावंतांपैकी कोणालातरी जिल्हाध्यक्ष पदाची संधी देऊन त्यांना काम करण्यास सांगितले असतं तर आम्हाला आनंद झाला असता परंतु पक्षासाठी शून्य योगदान असलेल्या माणसाच्या गळ्यात एवढ्या मोठ्या पक्षाची धुरा देणे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सर्वात मोठा अपमान आहे आणि हा अपमान सहन न झाल्याने आम्ही राजीनामा दिला आहे. ज्या प्रमाणे भाजपा पक्ष्यांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना घेऊन त्यांना पदे दिली जातात त्याप्रमाणे काँग्रेसच भाजप झालंय का? भाजपच्या लोकांना काँग्रेस पक्षात घेऊन मोठ्या पदावर बसवलं जातं कल्याण डोंबिवली मध्ये काँग्रेसची भाजपा होत चालली आहे.
