विवाह सोहळ्यात माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती
डोंबिवली : डोंबिवली राजाजी पथ येथील भाजपचे माजी नगरसेवक मुकुंद (विशु ) पेडणेकर यांच्या माध्यमातून तुळशी विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पूर्वी चाळ संस्कृती होती तेव्हा लोक घरोघरी दारोदारी तुळशी विवाह करत असत पण आता ती लोकपावत चाली आहे.
या कॉम्पुटरच्या युगात आजच्या पिढीला तुळशी विवाह चे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच आपली संस्कृती टिकून ठेवण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येते असे यावेळी माजी नगरसेवक मुकुंद ( विशू ) पेढणेकर म्हणाले.या विवाह सोहळ्यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील,भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हाप्रमुख नंदू परब,माजी नगरसेविका खुशबू चौधरी, पूनम पाटील, भाजपा डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर,मोहिर देसाई, प्रकाश पवार, मनीषा राणे, मिहीर दवते यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
