Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शालेय जीवनातील मुल्य शिक्षणातून भविष्यातील उत्तम नागरिक घडु शकतात - रामकृष्ण बाविस्कर , केंद्र प्रमुख

पारोळा केंद्र समुह शिक्षण परिषदेत गुणवत्तेसह मुल्य शिक्षणाचा जागर 

विचखेडे ता पारोळा दि २७ : नुकतेच राज्यातील सर्वच शिक्षकांचे मुल्यवर्धन प्रशिक्षण पार पडले . आपल्या शाळेत येणाऱ्या बालकाचे मन हे संवेदनाक्षम व संस्कारक्षम असते . या वयातच शिक्षकांनी त्यांच्या मनावर , मेंदूवर व हदयावर जीवनाचे नितीमुल्य रुजविली तर ती चिरकाल टिकणारी असतात . त्यातुन आपण देशाचे भावी उत्तम नागरीक घडवु शकतो " असे प्रतिपादन पारोळा केंद्र प्रमुख रामकृष्ण बाविस्कर यांनी केंद्र समुहाची आयोजित ४ थी शिक्षण परिषद उच्च प्राथमिक शाळा विचखेडे ता पारोळा या ठिकाणी शिक्षकांना मार्गदर्शन करतांना केले .

या परिषदेचे अध्यक्षपदी केंद्र प्रमुख रामकृष्ण बाविस्कर तर प्रमुख पाहुणे म्हणुन म्हसावद ता जळगाव केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत तसे ग्रेडेड मुख्याध्यापक राजेंद्र पाटील , राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे , वेदंती पाटील , मुल्यवर्धन तालुका सम्वयक यांच्यासह केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते .

शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले .

विद्यार्थीनींनी देशभक्ती या मुल्यावर आधारीत उत्कृष्ट गीत व नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली . त्यांना अनेक शिक्षकांनी रोख बक्षिसे दिली . त्यात जि प शाळा क्र ३ पारोळाचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी स्वच्छता हे मुल्य जोपासण्यासाठी २५ गुणवंत विदयार्थीनींना अंघोळीचा साबण , खोबरे तेल बाटली , टुथपेस्ट , टुथब्रश , थंडीची व्हॅसलिन डबी व शॅम्पू असे स्वच्छता पॅक भेट दिले .

विद्यार्थिनींनी वैयक्तीक व सामुदायीक स्वच्छतेची शपथ घेतली .

यावेळी वेदंती पाटील यांनी आपल्या शाळेच्या साप्ताहिक वेळापत्रकात मुल्यवर्धनच्या दोन तासिका घेण्याबाबत व बालकांच्या मनावर प्रशिक्षण घेतल्या प्रमाणे मुल्यवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन केले .

यावेळी मागिल महिन्याचा शालेय गुणवत्ता , शैक्षणिक उपक्रम व त्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न यांचा आढावा घेण्यात येवुन सर्वांनीच आपले अनुभव थोडक्यात कथन केले . माझा वर्ग माझे नियोजन बाबत शुभांगी लोहार व अनिल सोनवणे यांनी आपले विचार मांडले . निपुण महाराष्ट्र विश्लेषण हेमंत पाटील यांनी केले .

अध्ययन समृद्धी कार्यक्रम व खान अकादमी वर्ग नोंदणी बाबत चतुर पवार यांनी प्रात्यक्षिक सादर करून माहिती दिली .

या प्रसंगी शाळेचे माजी पदवीधर शिक्षक प्रदिप राजपूत यांची केंद्र प्रमुख पदी निवड व सुनिल बडगुजर यांची बदली झाल्याने त्यांना स्तुत्य निरोप देण्यात आला . शाळेचे अनिल सोनवणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला .

केंद्र प्रमुख रामकृष्ण बाविस्कर यांनी प्रशासकीय आढावा घेत . निपुण भारत अंतर्गत सर्वच बालके निपुण व प्रगत करण्याचा प्रयत्न , शाळा व्यवस्थापन सभा नियमित घेणे व लिंक भरणे बाबत , आधार व अपार आयडी बाबत , संविधान दिन साजरा लिंक भरणे बाबत व जयंत नारळीकर गणित व विज्ञान समृद्धी कार्यक्रम बाबत सखोल मार्गदर्शन केले .

मुस्तफा मोहंमद अरब यांनी उत्कृष्ट सुत्र संचलन केले व आभार प्रदर्शन गोपाल माळी यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |