Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कलारंग प्रॉडक्शन्स प्रस्तुत व कोकणी निखिल निर्मित आणि जनहित आधार हेल्प फंड आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक "गाव गोंधळ..." शनिवारी दादरला

मुंबई ( शांताराम गुडेकर ) : मुंबई ही मायानगरी मानली जाते. येते हवशे- नवशे येतात आणि आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसाच प्रयत्न आपले पंजोबा,आजोबा मग वडील जसे मुंबईत पुर्वी एकत्रीत मिळून खोली घ्यायचे आणि मग त्यात सोबत रहायचे. एकमेकांना सुख-दुःखात आधार असायचा, आता तर महागाई आणि आजारपण येवढे भरमसाठ वाढले आहेत त्याला सिमा उरलीच नाही यात आपला बांधव, सहकारी भरडला जात असेल, त्याला मुंबईत वास्तव्य करण्यासाठी रहाण्याची सोय नसेल त्याला येणाऱ्या अडीअडचणीला अपेक्षित तात्काळ आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नसेल तर त्याचा उदरनिर्वाह धकाधकीच्या जीवनात चालणार कसा, हाच मुळ गाभा लक्षात घेऊन दिनांक - १२ नोव्हेंबर २०१७ या वर्षी या जनहित आधार हेल्प फंड ची स्थापना करण्यात आली.

स्वप्न पहावित पण ती पुर्ण होतीलच असे नाहीत परंतु जनहित आधार हेल्प फंड याला अपवाद ठरला. त्यांनी स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी जिद्द धरली होती ती मुंबईत स्वत:च्या मालकी हक्काची एखादी खोली असावी आणि ते स्वप्न सत्यात उतरविले. विक्रोळी सुर्यनगर येथे जनहित आधार हेल्प फंड यांनी स्वतःच्या मालकीची खोली घेऊन पाहिलेले स्वप्न पुर्ण केले.

आजारपण कोणालाही सांगून येत नाही,जनहित आधार हेल्प फंड हा अनेक रूग्णांसाठी आर्थिक सहकार्यारूपी नवसंजीवनी बनुन काम करत आहे. आज तागायत यांनी १०,०००/- ते ५०,०००/- एवढी मोठी रक्कम एक हाती रुग्णांना देऊन त्याचा परतावा ही कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त दर न लावता घेतला आहे.

मराठी शाळा वाचायला हव्यात असे प्रत्येकाला मनापासून वाटतं, परंतु त्या वाचण्यासाठी आपण खारीचा वाटा म्हणून सहभागी किती होतो यावर अवलंबून असते. असाच खारीचा वाटा उचलला तो जनहित आधार हेल्प फंड यांनी शाळेतील मुलांना गर्मी आणि अंधुक प्रकाश ही वारंवार भेडसावणारी समस्या आवश्यक विद्युत उपकरणे देऊन दूर केली. त्यामध्ये एल ई डी ट्युब लाईट आणि पंखे व इतर साहित्य जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा, वाकी. ता. गुहागर, जि. रत्नागिरी. या शाळेतील शिक्षकांना स्वतंत्र दिनानिमित्ताने सुपुर्द केले.तसेच प्रति वर्षी शाळेतील मुलांना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला खाऊ वाटप करताना या हेल्प फंडातील सभासद स्वतः शाळेत हजर असतात.
कोरोना सारख्या महाभयंकर महामारी आधी सुरू असलेल्या अनेक छोट्या मोठ्या संस्था, फंड, बीसी यांसारखे आर्थिक सहकार्य करणारे मार्ग कोरोना काळात लोप जरी पावले असले तरी जनहित आधार हेल्प फंड हि संस्था कोणत्याही परिस्थितीत डगमगली नाही. यातील सर्व सभासदांनी सुरूवातीच्या काळात स्वतःच्या खिशाला कात्री लावली मात्र यश खेचून आणलेच.

अशी ही जनहित आधार हेल्प फंड संस्था सामाजिक व शैक्षणिक बाजू सांभाळत असताना आता मात्र सांस्कृतिक सहभाग घेण्यासाठी सज्ज होत आहे.शनिवार दिनांक - ०६ डिसेंबर २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह, दादर येथे सामाजिक आणि शैक्षणिक मदतीकरीता कलारंग प्रॉडक्शन्स प्रस्तुत व कोकणी निखिल निर्मित आणि जनहित आधार हेल्प फंड आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक "गाव गोंधळ..." या नाटकाचे आयोजन केले आहे.रसिक हो आपण हे नाटक पहाण्यासाठी आणि सामाजिक व शैक्षणिक मदतीकरीता तिकीट घेऊन नाटकाचा आनंद घ्यावा असे आवाहन जनहित आधार हेल्प फंड तर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |