1 लाख 30 हजार 926 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
ठाणे :- ठाणे जिल्हयातील कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि.02 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त अंतिम आकडेवारीनुसार एकूण 58.10 टक्के मतदान झाले असल्याची माहिती कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
मतदार यादीनुसार कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेमध्ये एकूण 24 प्रभागांमध्ये मतदान झाले. या 24 प्रभागांमध्ये एकूण 1 लाख 17 हजार 653 पुरुष, 1 लाख 7 हजार 686 स्त्री आणि 16 इतर असे एकूण 2 लाख 25 हजार 355 मतदार होते त्यापैकी 68 हजार 257 पुरुष, 62 हजार 667 स्त्री आणि 2 इतर असे एकूण 1 लाख 30 हजार 926 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी बातमीसोबत जोडण्यात आली आहे. मतमोजणी रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
