डोंबिवली ( शंकर जाधव) : डोंबिवलीतील पाथर्लीत राहणाऱ्या सृष्टी प्रवीण पाटील हिने श्रीलंका येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग प्रकारात ५ सुवर्ण पदकांची कमाई केली.
सृष्टी ही एका सर्वसाधारण कुटुंबातून असून तिने आणि तिच्या आई वडिलांनी मोठ्या कष्टाने तिची ही आवड जोपासली आणि त्याचे चांगले फलित ह्या यशातून सृष्टीने मिळविले…
शिवसेना डोंबिवली शहरातर्फे व कल्याण ग्रामीण विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम,सचिव संतोष चव्हाण, विभागप्रमुख अमोल पाटील यासह अनेक शिवसैनिकांनी सृष्टी प्रवीण पाटीलचे अभिनंदन केले.
ह्या पूर्वी देखील खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देण्यात आल्या होत्या,.
