नाशिक (प्रतिनिधी) :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्फे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० नुसार एम. ए. शिक्षणशास्त्र शिक्षणक्रमाची उद्बोधन कार्यशाळा शिक्षणशास्त्र विद्याशाखा संचालक डॉ. संजीवनी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित चार दिवसांची सदर कार्यशाळा दोन टप्प्यात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने झाली. त्यात राज्यभरातील विविध अभ्यासकेंद्रातील केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक संमंत्रक व संशोधन मार्गदर्शक असे एकूण ६९ जण सहभागी झाले.
कार्यशाळेत विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. जोगेंद्रसिंग बिसेन यांनी ‘विकसित भारत २०४७ मध्ये विद्यापीठांची भूमिका’ या विषयी प्रमुख मार्गदर्शन केले. विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य तथा शिक्षणशास्त्र विद्याशाखा संचालक डॉ. संजीवनी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीम. स्नेहल मांजरेकर यांनी या कार्यशाळेचे समन्वयन केले. तसेच एम.ए. शिक्षणशास्त्र संरचना आणि मूल्यमापन (प्रा. संजीवनी महाले), संशोधन कार्यासाठी विविध संस्यांकडून मिळणारे अनुदान (प्रा. व्ही. बी. गायकवाड), संशोधन कार्याच्या विविध स्रोतांचे उपयोजन (डॉ. प्रकाश बर्वे), संशोधन कार्य कृती सत्र ३ व सत्र ४ (श्रीम. स्नेहल मांजरेकर), संशोधन लेख / शोधनिबंध विकसन आणि AI चा वापर (डॉ. राजकुमार ननवरे), अध्यापनाविषयक क्षेत्रीय कार्य आणि आंतरवासिता कार्यवाही (डॉ. सुभाष सोनुने), संमंत्रक संकल्पना व संमंत्रक प्रतिमाने परिचय (डॉ. दयाराम पवार), संपर्कसत्र कार्यवाही (श्रीमती वर्षा बहिरम), प्राश्निक परीक्षक समीक्षक कार्य (प्रा. सज्जन थूल), परीक्षा पद्धत (डॉ. चंद्रकांत पवार) याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रश्नोत्तरे व खुली चर्चा करण्यात येवून उपस्थितांचे शंका निरसन करण्यात आले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सचिन सूर्यवंशी, विजय अहिरराव, प्रशांत गायकवाड, सचिन कटारे, रवींद्र सोनवणे, प्रदीप शिंदे यांनी सहकार्य केले.
