Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

सुमन भगवान म्हात्रे यांचे अल्प आजाराने दुःखद निधन

डोंबिवली : डोंबिवली पूर्व नांदिवली पंचानंद येथील रहिवासी सुमन भगवान म्हात्रे यांचे दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले . मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्षे होते.

नांदिवली पंचानंद येथील समशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा प्रमाणात ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.

सुमन भगवान म्हात्रे यांच्या पश्चात ३ मुले भास्कर, विश्वनाथ, सदानंद तर ५ मुली , कै.उषा मधुकर भोईर (मोठागाव ठाकुर्ली ) , सौ.सरस्वती वासुदेव भोईर (माणेरे), सौ.जनता विजय पाटील ( सोनारपाडा ) सौ.अनिता (जाई) अरविंद भोईर , सौ. गीता प्रभाकर पाटील तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा निधनाने म्हात्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांचा दशक्रिया (दहावा ) शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी भोपरगाव खाडी, गणेश घाट डोंबिवली (पूर्व ) येथे तर तेरावा विधी (उत्तरकार्य ) सोमवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी मल्हार कृपा निवास , नांदिवली पंचानंद येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |