मुंबई ( शांताराम गुडेकर ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी द्वारा आयोजित राज्यस्तर शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा 2025-26 स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. दिल्लीत पुढे ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर खेळवण्यात येणार असून बालमोहन विद्यालयची विद्यार्थी स्वराली संतोष पाटील हिची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या कोल्हापुर जिल्हातील गगनबावडा तालुक्याचे व मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते, हॉटेल व्यवसाय उद्योजक संतोष पाटील यांची कन्या स्वराली संतोष पाटील हिची 69 व्या राज्यस्तर शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा अंडर 14 साठी महाराष्ट्र संघासाठी मुंबई मधून निवड करण्यात आली आहे.
ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हातुन एक खेळाडू अश्या प्रकारे निवड करण्यात आली आहे. ज्या मध्ये महाराष्ट्र संघाची सदस्य म्हणून स्वराली पाटील हीची निवड मुंबई जिल्हातून करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा दिनांक 10 ते 15 जानेवारी 2026 दरम्यान दिल्ली येथे खेळवली जाणार आहे. स्वराली पाटील हीच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
