नवी मुंबई : कोपर खैरणे गावामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही '' धर्मवीर आनंद दिघे चषक- २०२५ 'क्रिकेट स्पर्धेचे सलग २४ व्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.यावेळी ही स्पर्धा आॅल इंडिया ओपन असणार आहे ह्या मध्ये १२ संघाचा समावेश असणार असुन संपूर्ण स्पर्धा लीग फ्राॅर्मेटने सामने खेळविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत विजेत्या संघाला ५ लाख व आकर्षक चषक , उपविजेत्या संघाला २ लाख ५० हजार रूपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे .या संपुर्ण स्पर्धेत मालिकावीर पुरस्कारासाठी ( Bike) बाईक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना एलईडी टिव्ही देण्यात येणार आहे.सदर स्पर्धा कोपरखैरणे गाव, सेक्टर -२३ येथील भुमि पुत्र मैदान येथे येत्या २२,२३,२४ आणी २५ डिसेंबर रोजी खेळविली जाणार आहे.या स्पर्धेचे आयोजन शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख प्रविण काळुराम म्हात्रे यांनी केले आहे.
स्पर्धेत एमसीए अंपायर सोबत, समालोचक रेडिओ जाॅकी , प्रदीप विचारे, ज्येष्ठ समालोचक दिलीप पाटील आणि चंदू शेटे हे असणार आहेत.त्याच बरोबर संपूर्ण स्पर्धेत प्रेक्षकांन साठी कॅच साठी ब्युटुथ हेडफोन देण्यात येणार आहेत.तर अंतिम सामन्याच्या दिवशी २५ डिसेंबर रोजी २ सुवर्ण गोल्ड क्राईन लकी ड्रॉ पद्धतीने प्रेक्षकांना देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धा व्यवस्थित पार पडावी म्हणून जय भवानी मित्र मंडळ,४० प्लस कोपरखैरणे तसेच अजिंक्य पाटील, सतीश रावत,चेतक पाटील, नंदन म्हात्रे, स्वप्निल पाटील आदी मेहनत घेत आहेत,अशी माहिती कोपरखैरणेतील क्रीडा प्रेमी अविनाश पाटील यांनी दिली.
ह्या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातील नामांकित खेळाडु खेळणार आहेत
