गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक १८/०१/२०२६ रोजी ०५.५६ वा.चे सुमारास साई पान शॉप समोर, फुटपाथवर, इंन्टरसिटी मॉलचे बाजुला, वागळे इस्टेट ठाणे पश्चिम येथे विधीसंघर्षित बालक नामे अबक रा. मु.खजुरिहा कला, तहसिल रामनगर राजापुर, जि. चित्रकुट रहेपुरा पोलीस ठाणा, राज्य उत्तर प्रदेश हा दोन गावठी बनावटीचे पिस्टल व ४ जिवंत काडतुसे असा एकुण २,१४,०००/- रु. किंमतीचा माल अवैधरित्या विक्री करण्याचे इरादयाने बेकायदेशीररित्या विनापरवाना कब्ज्यात बाळगुन ठेवले असतांना मिळुन आल्याने विधीसंघर्षित बालक नामे अबक याचेविरुध्द वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. | २०/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह महा. पो. कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / सुनिल तारमळे, खंडणी विरोधी पथक, ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ठाणे शहर, श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) ठाणे, श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध - २, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक/शैलेश साळवी, सपोनि / सुनिल तारमळे, पोहवा / ४०४४ ठाकुर, पोहवा / १८३४ शिंदे,, पोहवा / २७० जाधव, पोहवा / १५१० गायकवाड, पोशि/ १९८४ शेजवळ, मपोशि/ ८१०१ भोसले यांनी केली आहे.
