नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर -१९ मधील ग्रामदेवता श्री रांजणदेवी माता मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्राम विकास मंडळाच्या आयोजनाने ग्रामदेवता श्री रांजणदेवी माता साथ उत्सवाचे मंगळवारी २७ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.
श्री रांजण देवी माता कोपरखैरणे गांवाची ग्रामदेवता असुन ती पंचक्रोशीतील साक्षात्कारी दैवता म्हणून ओळखली जाते.कोपरखैरणे वासीण श्री रांजण देवी मातेचा ( वार्षिक साथ ) उत्सव कोणत्याही प्रकारे बळी न देता साजरा केला जातो.या वेळी साध्या भाजलेल्या तांदळाच्या पिठात गुळ टाकून केलेल्या लाडुचा नैवेद्य ( गांवच्या भाषेत पिठी ) म्हणून हा नैवेद्य दाखविला जातो.
श्री रांजण देवी माता साथ उत्सव जत्रा नसून फक्त देवी च्या दर्शनाचा भाग आहे.
या उत्सवा दरम्यान पहाटे देविचा अभिषेक - गावचे नवनिर्वाचित नगरसेवक - श्री.शिवराम परशुराम पाटील आणी नवनिर्वाचित नगरसेविका - सौ.अनिता शिवराम पाटील यांच्या शुभहस्ते तर साथ पुजन मंदिराचे पुजारी - श्री.भरत गोपाळ म्हात्रे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.त्याच बरोबर दिवसभर गावातील सर्व कुलदैवत कुटुंबीय यांची श्री सेवेचा भाग म्हणून कार्य पार पाडणार आहेत.त्याच बरोबर गावातील सर्व महिला - पुरुष भजन मंडळींचे भजन, हरिपाठ, मानसन्मान शेवटी श्री रांजण देवी मातेचा जल्लोष ( नाच नृत्य ) सादर करण्यात येणार आहेत.
साथ उत्सवाची परंपरा ग्राम विकास मंडळाचे पदाधिकारी, उत्सव समितीचे सभासद यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ग्राम विकास ( ग्रामस्थ ) मंडळाने जपली आहे.अशी माहिती ग्रामस्थ श्री.अविनाश भरत पाटील यांनी दिली.
