Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

श्री क्रीडा मंडळ खुंटवली अंबरनाथ यांच्या माध्यमातून "लोटे चषक 2026" क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

अंबरनाथ दि. २४ (नवाज वणू ) : श्री क्रीडा मंडळ खुंटवली अंबरनाथ यांच्या माध्यमातून "लोटे चषक 2026" क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी ते रविवार दि 22 फेब्रुवारी 2026 रोजी अंबरनाथ खुंटवली भवानी चौक, कबड्डी मैदान याठिकाणी पार पडला. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नामदेव कृष्णा लोटे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक भगवान लोटे व संदीप लोटे यांनी श्रीफळ फोडून व टॉस उडवून क्रिकेट सामन्यात सुरुवात करण्यात आली.

यावेळी राजाराम कृष्णा लोटे व श्रीनिवास वाल्मिकी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या क्रिकेट स्पर्धेत एकूण 32 संघानी सहभाग घेतला होता. अंबरनाथमधील 16 संघ तर महाराष्ट्रातील 16 संघ अश्या विविध संघाने सहभाग घेतला होता. या क्रिकेट सामन्यात प्रथम पारितोषिक 1,09,696/- रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक पारितोषिक 59,696/- रुपये तर तृतीय क्रमांक पारितोषिक 29,696/- रुपये तसेच सामन्यातील मालिकावीरासाठी हिरोहोंडा बाईक तर प्रत्येक सामन्यातील मालिकावीरासाठी चांदीचे नाणे देण्यात आले. तसेच प्रत्येक सामन्यानंतर प्रेक्षकांना लक्की ड्रॉ काढून 39 कूलर फॅन प्रेक्षकांना प्रोत्साहन म्हणून देण्यात आले. तर प्रत्येक सामन्यातील 15 रन काढणाऱ्या खेळाडूस आकर्षक बॅट देण्यात आले. तसेच कल्याण येथील डिंग डॉन जॉर्ज संघाला विशेष प्रथम पारितोषिक 1,09,696/- रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक अंबरनाथ मधील एन. एम. बॉईज संघाला पारितोषिक 59,696/- रुपये तर तृतीय क्रमांक अंबरनाथ रोझ टीमला पारितोषिक 29,696/- रुपये देण्यात आले. तसेच मालिकावीर करण पाटील याला हिरोहोंडा बाईक तर मालिकेत 108 रन व 3 विकेट घेतलेल्या विजेत्याला 15000 रुपये कॅश प्राईझ देण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आकाश शिंगाडे, उत्कृष्ट गोलंदाज विजय मुद्लियार, उत्कृष्ट फलंदाज ए. पी. गणेश व मालिकेत एकूण 80 रन काढलेल्या विजेत्याला 15000 रुपये कॅश प्राईझ देण्यात आले. तसेच श्री साई स्पॉट्सचा मंडळास उत्कृष्ट योगदान दिल्याने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सदर सामन्यासाठी पंच अजित निकम, संदीप आचार्य, मिलिंद पाचर्णे, अरविंद दुघे, गुणलेखक निलेश वैती, पवन शेलार, सूत्रसंचालन व कॉमिटेरर अनुज मोरे, चंद्रकांत शेटे, सागर मोरे, मनीष भागले, प्रशांत अतावडे, मयूर भोईर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नगरसेवक पवन सुरेश वाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ठाणे जिल्हा सरचिटणीस किशनराव तरमळे, अंबरनाथ नगरपालिका नगराध्यक्ष सौ. तेजस्विनी करंजुले पाटील, उमेश पाटील, संदीप लकडे, श्रीनिवास वाल्मिकी, आमदार बालाजी किणीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शिवसेना गटनेता रवी करंजुले यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व क्रिकेट रसिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |