नवी मुंबई : कोपर खैरणे येथील आयोजक - यश करांडे,ह.भ.प.ऋषिकेश ठाकुर ( कोपरी ), निखिल वेटा, रोहीत साळुंखे, तसेच तेजस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही यावर्षी कोपरखैरणे नगरी ते श्री क्षेत्र आई एकवीरा देवी मंदिर, कार्ला डोंगर दरम्यान "आई एकवीरा देवी पालखी" पदयात्रा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
१४ मार्च रोजी सकाळी १० वाजता सेक्टर १० येथे मातेची आरती केल्यानंतर कोपरखैरणे गावातील प्रवेशद्वार ( तिनटाकी ) येथुन गणेश मंदिर, कोपरखैरणे गावाची ( वेशी ) शिवसेना शाखेच्या आवरातुन श्री हनुमान मंदिराच्या आवारातुन गावची ग्रामदेवता असलेल्या श्री रांजनदेवी मातेच्या मंदिरात आई एकवीरा देवी मातेचे गाणी प्रसिद्ध असलेले गायक - मकरंद बाणकोटकर यांच्या माध्यमातून गीत सादर करण्यात आले त्यानंतर " आई एकवीरा देवी पालखी" कार्ला गडाकडे मार्गस्थ झाली.कोपरखैरणे नगरीची मानाची पालखी अशी ख्याती असलेल्या " आई एकवीरा देवी पालखी ' चे यंदा २ रे वर्ष असुन, या पालखी सोहळ्यात नवी मुंबई विभागातील २०० ते ३०० पेक्षा अधिक तरुणांनी या मध्ये सहभाग घेतला होता.अशी माहिती कोपर खैरणेचे ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.
दरवर्षी प्रमाणे यंदाही कोपरखैरणे येथुन "आई माऊली उदो उदो " या जयघोषात कोपरखैरणे नगरीची मानाची "आई एकवीरा देवी पालखी " कार्ला गडावर मार्गस्थ झाली.यावेळी नवी मुंबई आणि इतर गावा मधील तरुण - तरूणींनी पालखीत सहभाग घेतला.
