स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज रूपेश डाउरकर, उत्कृष्ट गोलंदाज - जितेश गणेश डाउरकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण - देवळ साष्टे आणी मालिकावीर - राज डाऊरकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक चषक देण्यात आला. या स्पर्धेत महापे गावातील डाऊरकर किंग,डाऊरकर ब्लास्टर ,डाऊरकर वाॅरियस,डाऊरकर टायगर्स आणी डाऊरकर पॅंथर्स हे ५ संघ सहभागी झाले होते अखेर च्या रंगतदार सामन्यात " डाऊरकर किंग या संघावर मात करत, "डाऊरकर पॅंथर्स " हा संघ यंदाच्या " डाऊरकर प्रिमियर लिग या स्पर्धेचा मानकरी ठरला. हया स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी नामदेव डाऊरकर ( मा.नगसेवक ), अशोक डाउरकर, एकनाथ डाउरकर,भरत डाउरकर, नितिन डाऊरकर, महेश डाऊरकर , गजानन पाटील आणी दिपेश पाटील यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
त्या वेळी स्पर्धेचे आयोजक - रूपेश डाऊरकर, प्रशांत डाऊरकर, मिलिंद डाऊरकर ,अजय पाटील,मुकेश डाऊरकर, दत्ता साष्टे,प्रितेश पाटील, अनिरुद्ध डाऊरकर, हर्षद डाऊरकर, विनित पाटील आणी कमलाकर डाऊरकर यांच्या उपस्थित बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.अशी माहिती क्रिडा प्रेमी अविनाश भरत पाटील यांनी दिली.
