Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

आगरी-कोळी समाजाची वर्षातून एकदा आपले कुलदैवत जेजुरीला नेण्याची पारंपरिक प्रथा आजही कायम

नवी मुंबई -: महाराष्ट्रातील लाखों भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबा कुलदैवांचा मान हा चैत्र महिन्यापर्यंत जेजुरी गडावर पाहायला मिळतो.त्यामुळे हा आनंद काही औरच आहे.आगरी कोळी समाजात श्री कुलदैवताला प्रथम पुजले जाते.प्रत्येक कुटुंबातील कुलदैवतांचे काही ठिकाणी मंदिरे उभारली आहेत. तर काहींचे कुलदैवत हे कुटुंबातील एकाच्या घरात प्रतिष्ठापित केले जातात. त्याच आगरी कोळी समाजात पुर्वी पासुन वर्षातुन एकदा तरी जेजुरीला देव घेऊन जाण्याची प्रथाआहे. ही प्रथा नव्या पिढीकडुन ही कायम जोपासली जाते.

या अनुषंगाने कोपरखैरणे गावातील पाटील कुटुंबीय ( कोटाची आळी ) या पाटील कुटुंबात एकोपा पाहायला मिळतो.दिवाळी नंतर सुरू होणारा कुलदैवताचा आर्शिवाद घेण्याचा काळ मानला जातो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील आपल्या परिवारातील सदस्य हे जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी' सदानंदाचा येलकोट ', येळकोट ', येळकोट ',जय मल्हार ', खंडोबाच्या नावानं चांगभलं ", असा जयजयकार करीत जात असतात.आपल्या देव घरात असणाऱ्या कुलदैवताच्या म्हणजे खंडोबाच्या प्रतिमा व ( टाक देवाची पादुका ) जुने जर्ज झाले असतील ते देखील जेजुरी गडावरून नवीन आणले जातात.एक प्रकारे अश्या पद्धतीने वर्षातुन एकदा तरी देवांची भेट घडवून आणली जाते.

आगरी-कोळी समाजातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य हे प्रत्येक घरातून वर्गणी गोळा करून त्यामध्ये प्रवास भाडे, राहण्याचा व जेवणाचा असा एकत्रित खर्च वर्गणी स्वरूपात एकत्रितपणे जमा केला जातो.वाजत गाजत कुलदैवत जेजुरी गडावर घेवुन जातात.आगरी - कोळी समाजातील सध्या कुलदैवतांच्या भेटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आखले जात आहेत.कोपरखैरणे गावात असणाऱ्या पाटील, मुकादम,आगास्कर, म्हात्रे, वेटा आदी कुटुंबांचे प्रत्येकाचे वेगवेगळी घरची कुलदैवत आहेत.यात प्रामुख्याने कुलदैवत असणाऱ्या खंडोबाचा समावेश आहे.ह्याच अनुषंगाने कोपरखैरणे येथील पाटील कुटुंबीय ( कोटाची आळी ) या कुटुंबीयांनी गावाच्या वेशीवर आल्यावर ढोल ताशा बॅन्ड पथकांच्या गजरात देवाची मिरवणूक नाचत भंडारा उधळत काढण्यात आली होती.त्यानंतर कुलदैवतेची स्थापना देवघरात केली गेली अशी माहिती श्री.अविनाश भरत पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |