नवी मुंबई:- कोपरखैरणे येथील सहयोग मित्र मंडळाच्या वतीने कै.महेंद्र वेटा ( कपुर दा ) यांच्या स्मरणार्थ कुलदैवत क्रिकेट स्पर्धेचे २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मांगीरदेव, कोटकर कुटुंब या कुलदैवत संघाने विजेतेपद पटकावले तर वेटा आळी कुंटुब या कुलदैवत संघाने उपविजेतेपद मिळवले तसेच विद्याभाऊ पाटील कुटुंबीय या कुलदैवत संघाने तिसरा क्रमांक मिळवत समाधान मानले या स्पर्धेत एकूण १२ कुलदैवत असणाऱ्या संघांनी सहभाग नोंदविला होता.या संपुर्ण स्पर्धेत खेळाडूंनी चुरशीच्या लढती सादर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
वैयक्तिक कामगिरीत उत्कृष्ट फलंदाज - प्रणित म्हात्रे, उत्कृष्ट गोलंदाज -कैलास वेटा , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - नयन वेटा, फायनल मैच चा सामनाविर - विनेश म्हात्रे तसेच संपूर्ण स्पर्धेत मालिकावीर म्हणून - प्रणित म्हात्रे यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्या मांगीरदेव ,कोटकर कुटुंब या कुलदैवत कुटुंबीय संघाला मोठा बोकड (बकरा ) व आकर्षक चषक तसेच उपविजेत्या वेटा आळी कुटुंब या कुलदैवत कुटुंबीय संघाला छोटा बोकड ( बकरा ) व आकर्षक चषक तसेच तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्याभाऊ पाटील कुटुंबीय या कुलदैवत संघाला ६ कोंबड्या व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी श्री.दत्त्तात्रेय जोमा म्हात्रे ( दत्तु मामा ), श्री.नारायण बामा म्हात्रे, श्री.विद्यानंद दिनानाथ पाटील ( भाऊ ), श्री.सदानंद प्रधान म्हात्रे, श्री.रविकांत मोरेश्वर म्हात्रे (क्रिकेटर ), श्री.नारायण काशिनाथ म्हात्रे,चद्रकांत पाटील (CM), दिनेश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी स्पर्धेचे मुख्य आयोजक - प्रयुक्ता मित्र मंडळ चे श्री.जय बाळाराम म्हात्रे, रेडमुन एजेन्सी चे ओनर- श्री.राजेश लालचंद्र वेटा यांच्या समावेत आयोजक चंद्रकांत पाटील,कु.स्वराली महेंद्र वेटा ,विनय वेटा,मनोज वेटा ( माॅन्टी ), रूपेश पाटील,दिलीप पाटील, योगेश म्हात्रे, राकेश वेटा, श्रीनिवास पाटील, संदीप पाटील ( लालु ), शिवाजी जाधव, संजय पाटील,रवि वेटा,विराज वेटा,सुधिर पाटील, राकेश म्हात्रे, ज्ञानेश्वर पाटील (ज्ञानबा) आणि राजु म्हात्रे आदी उपस्थित होते.
या यशस्वी आयोजना बाबत माहिती क्रिडा प्रेमी अविनाश भरत पाटील यांनी दिली.सहयोग मित्र मंडळाच्या उपक्रमा मुळे स्थानिक क्रिकेट पटुंना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याची भावना उपस्थित क्रिडा प्रेमींनी व्यक्त केली.
