Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कोपरखैरणेत श्री संत तुकाराम महाराज बिज महोत्सवाचे आयोजन

नवी मुंबई: दरवर्षी प्रमाणे यंदाही कोपरखैरणे सेक्टर -१९ येथील श्री हनुमान मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय मंडळ यांच्या वतीने संत तुकाराम महाराज महोत्सव भक्तिभावात साजरा करण्यात आला.ह.भ.प.वै.गुरूवर्य एकनाथ म्हात्रे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली गेल्या ३५ वर्षे हा धार्मिक सोहळा सातत्याने आयोजित करण्यात आला होता.परिसरातील भाविकांमध्ये ह्या महोत्सवास विशेष महत्त्व असल्याचे दिसून आले.

उत्साहानिमित्त सकाळी ८ ते ९ या वेळेत वारकरी भजनी मंडळाच्या माध्यमातून भजन सादर केले.सकाळी १० ते १२ च्या दरम्यान ह.भ.प बबन महाराज नाईक ( बोनकोडे गाव ) यांचे किर्तन रंगले होते.दुपारी आरती , महाप्रसादाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते.यावेळी भाविक भक्तांनी संत तुकाराम महाराजांचे रांगेत दर्शन घेतले. 

संत तुकाराम महाराज बिज महोत्सवाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी श्री.कृष्णा एकनाथ म्हात्रे, सौ.जयवंता कृष्णा म्हात्रे यांच्या सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.अशी माहिती ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |