Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ठाणे महानगरपालिकेच्या २०२६-२०२७ अर्थसंकल्पीय महासभा : नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी आपल्या प्रभागातील विशेषतः दिवा-साबे परिसरातील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाचे वेधले लक्ष

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या २०२६-२०२७ या अर्थसंकल्पीय महासभेत नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी आपल्या प्रभागातील (विशेषतः दिवा-साबे परिसर) प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले आणि खालील प्रमुख मागण्या केल्या:

साबे गावासाठी स्टेशन पासून एकच रस्ता असल्याने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्ययी मार्ग उपलब्ध करण्यात यावा.

दिवा स्टेशनला २०१८ पासून ब्रिजचे काम अपूर्ण आहे ते काम लवकरच जागा हस्तांतरित करून शेतकऱ्यांना मोबदला देऊन पूर्ण करावे.

प्रभागात सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध व्हावेत , प्रभागात मोठया प्रमाणात पाणी समस्या आहे ती लवकरात लवकर दूर व्हावी. नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत . प्रभागातील टीएमसी शाळा क्रमाक ८० हि इयत्ता ५ वी पर्यंत आहे ती माध्यामिक शाळा करावी व सेमी इंग्लिश चालू करावी. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने साफसफाई, गटारे नाले सफाई करणे बाबत योग्य कार्यवाही व्हावी. प्रभागात ड्रग्स, चरस, गांजा या नशेबाबत कारवाई करून त्यांची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच

ठाणे महानगरपालिकेने मान्यता दिलेले काही डॉक्टर रुग्णाची लूटमार करत असल्याचे निदर्शनास येत आहे अश्या डॉक्टरांवर योग्य कारवाई व्हावी.

प्रभागात रस्तावर विक्रेते मोठया प्रमाणात हातगाड्या लावत असल्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे याचा मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे यावर ठोस कार्यवाही करण्यात यावी.

प्रभागातील नागरिकांना मोठे मैदान किंवा दिव्यातील वृद्ध व्यक्तींना छोटे गार्डन किंवा जेष्ठ नागरिक कट्टा चालू करावा. साबे विभागात गणेश विसर्जनासाठी गणेशघाट आणि दशक्रिया विधी स्थळ बांधून मिळावं तसेच स्मशान भूमीत अंत्यविधी मोफत करण्यात यावी साठी नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी ठाणे महापालिकेच्या महासभेत आवाज उठविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |