Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

आगासन येथील गावदेवी मातेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात सम्पन्न

दिवा/ठाणे : ठाणे जिल्ह्यातील आगासन येथील गावदेवी मातेचा वर्धापनदिन सोहळा दिनांक 13 मार्च ते 14 मार्च दरम्यान अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. आगासन हे गाव ग्रामदैवत गावदेवी मातेच्या श्रद्धेसाठी ओळखले जाते.

वर्धापनदिनानिमित्त मंदिरात पहाटेपासूनच देवीला अभिषेक, पूजा-अर्चा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यासाठी आगासनसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.

दिनांक 14 मार्च रोजी ह.भ.प. कैलाश महाराज निचिते शहापूर यांच्या सुश्रव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले . यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी या कीर्तनसेवेचा लाभ घेतला. तसेच रात्री लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आगासन येथील हे मंदिर परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, दरवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने गावकरी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |