Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शेतमजुरांच्या मुलाने जिद्दीने पोलीस भरती मैदानात परीक्षा जिंकली

मुंबई - ग्रामीण भागातील शेतमजूरांची मुले मुंबई पुणे शहरात जाऊन कष्टाची कामे करतात,आणि आईवडीलांना आर्थिक मदत करतात.तेव्हा आईवडील त्याच्या कामाचे कौतुक करतात.पण जेव्हा मुलगा काम न करता अनेक विषयाच्या परीक्षा देतो,त्यात नपास होतो.त्यात तो पोलीस बनण्यासाठी जी मेहनत घेतो.त्यातही थोड्या गुणाने नपास होतो. तेव्हा आईवडीलांना मोठे दुःख होते.मुलगा हार न मानतात आईवडीला बरोबर शेतात कष्टाची कामे करतो.पण पोलीस भरती परीक्षा देण्याची बौद्धिक व शारीरिक मेहनत करणे सोडत नाही,२०१९ पासून तो जिद्दीने लढत राहतो, आणि एक दिवस विजयी होऊनचं गावात प्रवेश करतो. त्यावेळी केवळ आईवडीलांनाचं नाही तर अख्खा गावाला आनंद होतो, एक खेड्या गावांचे नांव त्यांच्या जिद्दीने लढाई ने तालुका परिसरात नव्हे जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरते.

नागपूर ग्रामीण पोलीस भरती अंतर्गत पोलीस शिपाई पदांसाठी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पूर्ण झाली असून,त्यात तो पूर्णपणे यशस्वी झाला.किती गुण मिळवले हे महत्वाचे नाहीचं तो उत्तीर्ण झाला.हे महत्वाचे ठरले आहे. एका शेतमजूराच्या मुलाने करण संगीता अर्जुन वानखडे याने विजय मिळविला.तेव्हा एका कष्टकरी शेतमजुरांच्या मुलाने पोलीस भरती परीक्षेत विजय मिळवला.त्यामुळे त्याचा तो विजय अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबी गावांचे नांव मुंबई पासून नागपूर पर्यंत प्रेरणादायी लक्षवेधी ठरला आहे. शेतमजूर म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतःच्या शेताऐवजी दुसऱ्याच्या शेतात किंवा शेती व्यवसायात (पशुपालन, मशागत, कापणी इ.) शारीरिक श्रम करून रोख रक्कम किंवा वस्तूंच्या स्वरूपात मजुरी मिळवते.हे मजूर प्रामुख्याने भूमिहीन असून रोजंदारी किंवा हंगामी तत्त्वावर काम करतात.जे लोक शेतीतील विविध कामांसाठी रोजनदारी वर काम करतात, त्यांना शेतमजूर म्हणतात.जमिनीची मशागत,पेरणी,कापणी, पिके काढणे,पशुधन सांभाळणे आणि इतर शेतीविषयक कामे करणे हे मजूर प्रामुख्याने त्यांच्या शारीरिक श्रमावर आणि रोजंदारीवर जगतात.भूमिहीन शेतमजूर ज्यांची स्वतःची जमीन नाही.आणि अल्पभूधारक ज्यांची जमीन कमी आहे आणि जे दुसऱ्यांच्या शेतातही काम करतात.ग्रामीण अर्थव्यवस्थेत हे सर्वात असुरक्षित,असंघटित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट मानले जातात.शेतमजूर हे भारतीय शेतीचा कणा आहेत,तरीही त्यांना अनेकदा सामाजिक आणि आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. यामुळेच त्यांच्या मुलाचे शिक्षण नववी दहावी च्या पुढे जात नाही.ज्याने कोणी जिद्धीने शिक्षण घेतले तरी नोकरी मिळेलच यांची शास्वती नसते. तेव्हा तो जे काम मिळेल ते करून वाटचाल करत असतो.

करण संगीता अर्जुन वानखडे सारखा तरुण ज्या जिद्दीने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करतो तेव्हा त्यांचे प्रेरणा स्थान हे निश्चितच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच असते.त्यांनी सांगितलेले शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश डोळ्यासमोर ठेऊनच करण वानखडे याने हे पोलीस भरतीचे यश मिळविले आहे.त्यामुळेच निंबी गावाचे सरपंच करुणा विशाल वानखडे, विशाल वानखडे संपूर्ण वानखडे परिवारासह गावकऱ्यांनी 'डोल ताशा लावून गावांत भव्य मिरवणूक काढली.कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या मुलांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. त्यांचे तालुक्यातील सामाजिक संस्था संघटना पदाधिकारी यांनी हार्दीक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मुंबई वरून सामाजिक कार्यकर्ते नारायण वानखडे,विजया प्रभाकर वानखडे,पत्रकार,कामगार नेते,साहित्यिक सागर रामभाऊ तायडे यांनी करण वानखडे,अर्जुन वानखडे यांचे विशेष हार्दीक अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |