Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी नवी मुंबईचे सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांची नियुक्ती.

उरण दि ७ ( विठ्ठल ममताबादे ) :  महाराष्ट्र राज्यातील आगरी-कोळी समाज हा पारंपरिक, सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या फार महत्त्वपूर्ण घटक आहे. कोकणात आणि विशेष करून मुंबई महानगर प्रदेशात प्रभावी लोकसंख्या असलेला आणि स्थानिक भूमिपुत्र असलेल्या ह्या समाजाला गेल्या पन्नास वर्षात अनेक प्रकल्पांनी वेढा घातलेला असून या समाजास विविध शासकीय, शैक्षणिक, रोजगार व सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

आगरी व कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या समस्या शासन प्रशासन स्तरावर प्रभावीपणे मांडून सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” ची स्थापना करण्यात आलेली असून त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सक्षम आणि उमदे नेतृत्व, अनुभवी व समाजकार्याची जाणीव असणारे नवी मुंबईतील उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांच्या कडे देण्यात आलेली असून त्यांची “राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार - आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे ह्यांच्या हस्ते आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून पक्षाची आणि समाजाची प्रतिमा उंचावून समाजाच्या हितासाठी निष्ठेने कार्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी नवी मुंबईचे सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |