डोंबिवली ( शंकर जाधव ) : पालिका शाळा शासनाला दाखविण्यापूरती आहेत का? शैक्षणिक दर्जा उंचावत का नाही? या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या अंगी कला गुणांना वाव मिळतोय का? दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत या शाळेतील शिक्षकांना गांभीर्य आहे का? असे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्याकरता शिक्षण समितीच्या भाजपा सदस्या रसिका कृष्णा पाटील या 27 गावातील जिल्हा परिषद शाळेची अचानक पाहणी करणार आहेत. मात्र तारीख जाहीर करणार नाही, अचानक शाळेत जाणार कारण शाळेतील वास्तविकता प्रत्यक्ष पाहणे आवश्यक आहे असे सदस्य पाटील म्हणाल्या.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळांची आता 60 च्या पुढेहि नाही. शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, शाळेचा निकाल, इतर कलात्मक कार्यक्रम,स्पर्धा,सहल यावर अधिकाधिक भर दिला जात नाही. हि वास्तविकता महापौर, उपमहापौर, पालिका आयुक्त व सर्व लोकप्रतिनिधी यांना माहिती आहे. त्याकरिता शिक्षण समितीचे लक्ष असणे आवश्यक असते.
विस्तार अधिकारी यांच्या अधिकारात शाळेच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. शैक्षणिक दर्जापासून ते पोषण आहार पर्यत माहिती ठेवणे हेही आवश्यक असते.
गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये याकरता शासनाने शहरात पालिका शाळा व गावात जिल्हा परिषद शाळा सुरु केल्या. पण इंग्लिश भाषेतून शिक्षण हे महत्वाचं मानलं गेल्याने जास्तीत जास्त कल खाजगी शाळांकडे वळला. परंतु सरकारी शाळा पटसंख्या कमी होत असल्याने कमी होत गेल्या. यात कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांचा वरचा क्रमांक लागतो. कमी पटसंख्या होण्यामागील कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्यात शिक्षण विभाग फारशी आवड नाही हे दिसून येते. यावर नवनियुक्त शिक्षण समिती सभापती व सदस्यांनी लक्ष देऊन गरीब विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण कसे मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शिक्षण समिती भाजपा सदस्य रसिका कृष्णा पाटील यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मला जेव्हा पक्षाने हे पद दिले तेव्हा ठरविले की पालिका शाळांचा कायापालट करणार. भाजपा प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि. जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी आम्हाला नेहमी सांगितलं आहे की समाजसेवा करा, त्यानुसार गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे मिळेल याकडे लक्ष देणार आहे.
27 गावातील जिल्हा परिषद शाळा कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत येतात. पालिका शाळा आणि 27 गावातील शाळा यांची पाहणी करणार आहे. प्रथम 27 गावातील 27 गावातील शाळांची अचानक पाहणी करणार आहे असे शिक्षण समिती सदस्या रसिका कृष्णा पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
