दिवा : खेळाडूंच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दिव्यात टायगर कन्स्ट्रक्शनच्या वतीने ओम साई नगर चषक 2026 अंडर आर्म क्रिकेट स्पर्धांचे चे दिनांक 12 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते .
क्रिकेट स्पर्धेची सुरवात राष्टगीताने करण्यात आली. आगासन येथील जी आर पाटील टर्फमध्ये या स्पर्धा भरविण्यात आल्या. 14 संघांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविण्याचा मान आई लक्ष्मी चाळ तर द्वितीय क्रमांक अनंत लक्ष्मी चाळ या संघाने पटकाविला. विजेत्या संघांना चषक व गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक दीपक जाधव हे उपस्थित होते.
या क्रिकेट सामन्यांचे आयोजन रमाकांत मढवी उर्फ टायगर भाऊ यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
