Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

आई गावदेवी मरिआई पालखी सोहळ्यात जल्लोष

 महापे गावात देवाचा चैत्रोत्सव पालखी व जत्रा उत्सव भक्तिभावात साजरा

नवी मुंबई : महापे गावातील ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून आई गावदेवी मरिआई पालखी व जत्रा उत्सवाचे आयोजन गुरुवार (ता.९ ) रोजी गावदेवी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पालखी सोहळ्यात सहभाग घेत गावदेवी मरिआई चा सुप्रसिद्ध गायक- आशिष म्हात्रे तसेच आई एकवीरा मातेचे गाणी प्रसिद्ध असलेले गायक - मकरंद बाणकोटकर यांच्या यांच्या गाण्यावर जयघोष करीत एकत्र जल्लोष केला गेला.

चैत्र शुद्ध महिना सुरू झाला की प्रत्येक गावोगावी जत्रा हे प्रत्येक गावागावात ठरलेले असते.त्यात आगरी -कोळी लोकांच्या गावदेवी जत्रा म्हणजे एक प्रकारचा उत्सव म्हणून अश्या ह्या जत्रेंची रहिवाशी वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात.अशातच गावदेवी मरिआई पालखी सोहळा व जत्रेचे येथील ग्रामस्थ उपस्थित राहून आपपल्या परीने साजऱ्या करतात.महापे गावातील आई गावदेवी मरिआई मंदिरात येथील ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही परंपरा कायम ठेवली आहे जत्रात्सव साजरा करतात.यंदा गुरुवार व शुक्रवार अश्या दोन दिवस ह्या सोहळ्यात सकाळी देवीचा अभिषेक व पुजन श्री संदीप डाऊरकर सौ.शर्मिला डाऊरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.दुपारी गावदेवी माता भजन मंडळ यांच्या माध्यमातून सुश्राव्य असे भजन करण्यात आले.सांय ७ वा.आई गाव देवी मरिआई च्या पालखी मिरवणूक काढण्यात आली.

ह्या पालखी सोहळ्यात गावातील ज्येष्ठांसहीत महीला , तरुणांनी सहभाग घेतला होता,तर लहान मुला- मुलींनी पारंपरिक पद्धतीने आगरी- कोळी वेशभुषा परिधान करून गाण्यांवर ठेका धरला.गावातील घराघरामधुन पालखी चे मनोभावे स्वागत करून औक्षण करण्यात आले.

ह्या वेळी संदीप डाउरकर, रूपेश डाउरकर, बाबुराव डाउरकर, गजानन पाटील, अशोक पाटील, मुकेश डाउरकर, सचिन डाउरकर, प्रतीक पाटील, निलेश म्हात्रे,भरत डाउरकर, अशोक डाउरकर आणि एकनाथ डाउरकर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |