Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

१४ गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करा - नगरसेविका प्रतीक्षा पाटील

पालिकेने पुढाकार घेऊन दाखले देण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेत काही महिन्यापूर्वी समाविष्ट झालेल्या १४ गावांना अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून या मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत केली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना नगरसेविका पाटील म्हणाल्या की, १४ गावांचा सर्व समावेशक विकास आराखडा तयार करावा. याठिकाणी असणारी ४०० ते ४५० एकर शासकीय - जमिन महापालिकेने - ताब्यात घेऊन - त्याठिकाणी रुग्णालय, - नागरिकांसाठी नागरी आरोग्य केंद्र, शाळा,बहुउद्देशीय इमारत, खेळाडूकरिता क्रीडांगण, नागरिकांसाठी उद्यान उभारावे, याठिकाणी १ ली ते ७ वीच्या ३ शाळा, पहिली ते चौथी ११ शाळा असून त्या शाळा पालि के ने ताब्यात घेऊन शालेय सुविधा द्याव्यात, येथील तलाव, विहिरी पुनर्जीवित करून जलस्त्रोत उपलब्ध करावे, ग्रामपंचायत कालीन दफ्तर ताब्यात घेऊन त्याठिकाणी पालिकेच्या माध्यमातून मालमत्ता आणि पाणी पट्टी आकारणी करून कर वसुली सुरू करावी, ग्राम पंचायती मार्फत दिले जाणारे जन्म मृत्यू दाखले गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आल्याने बंद करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेत समाविष्ट झाल्याने दीर्घकाळ विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या १४ गावाच्या विकासाला मिळणार आहे. अर्थसंकल्पातून येथील नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा देण्याच्या अनुषंगाने पालिकेकडे लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात मागणी केली आहे. - प्रतीक्षा पाटील, भाजप नगरसेविका, प्रभाग १४.
व्यावसायिक गाळ्यांना कर आकारणी करावी

पालिकेने पुढाकार घेऊन दाखले देणे सुरू करावेत, व्यावसायिक गाळ्यांना कर आकारणी करून वसुली सुरू करावी. त्याचप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांनी केली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे ७ मार्च २०२४ च्या अधिसूचनेनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेत अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावांमधील पायाभूत सुविधा महापालिकेने देऊन एक आदर्श नगरी म्हणून विकसित करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |