उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सहकार्याने काम; माजी उपमहापौर मढवी यांच्या हस्ते शुभारंभ
शिळगांव / ठाणे ( विनोद वास्कर ): शिवसेना-भाजप महायुतीने शिळफाटा परिसरात पुन्हा एकदा विकासकामांचा धडाका लावला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार राजेश मोरे यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक २९ मधील चार गावांतील स्मशानभूमींच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
मंगळवारी, २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन पार पडले.
‘या’ गावांना मिळणार दिलासा :देसाई गाव पाटील पाडा, खिडकाळी, शिळगाव व खार्डी या चार गावांतील स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी नागरिकांची मोठी गैरसोय होते. आता पत्र्याचे शेड, बसण्यासाठी ओटे, पाण्याची टाकी, विद्युत व्यवस्था व सुशोभीकरण अशी कामे केली जाणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिवसेना-भाजपचे नगरसेवक एकवटले
भूमिपूजन सोहळ्यास शिवसेनेचे नगरसेवक बाबाजी पाटील,भाजपा नगरसेविका वेदिका साहिल पाटील, शिवसेनेच्या नगरसेविका अर्चना निलेश पाटील, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष अभियंता प्रकोष्ट ठाणे साहिल पाटील, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळाराम पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले होते.
यावेळी विभागप्रमुख विष्णु कोटकर, निलेश पाटील, विभाग संघटक नवनाथ पाटील, मधुकर पाटील, उपविभागप्रमुख दिपेश पाटील, रोहिदास म्हात्रे, वैभव आलिमकर, शाखाप्रमुख शंकर पाटील, जयंता वाळीलकर, सुदर्शन पाटील, सुंदर आलिमकर, धोंडू निघुकर, निवृत्ती पाटील, सुवर्णा पाटील, सावन ठाकूर, बाबुराव पाटील, महेश ठाकूर, राहुल पाटील यांच्यासह शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘महायुती विकासासाठी कटिबद्ध’
“प्रभाग २९ च्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना-भाजप महायुती कटिबद्ध आहे. नागरिकांच्या सुख-दुःखात आम्ही सदैव सोबत आहोत,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नगरसेवक बाबाजी पाटील यांनी दिली.
“महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. स्मशानभूमीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर काम करून आम्ही नागरिकांच्या भावनांचा सन्मान करत आहोत,” असे भाजपचे जिल्हाध्यक्ष अभियंता प्रकोष्ट ठाणे साहिल पाटील म्हणाले.
भाजपा नगरसेविका वेदिका साहिल पाटील म्हणाल्या, “महिला म्हणून या कामात सहभागी होताना विशेष आनंद होतोय. अंत्यसंस्काराच्या वेळी महिलांची होणारी गैरसोय आता दूर होईल.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचे आम्ही आभारी आहोत.”
ग्रामस्थ भावूक : ‘जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागणार“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आमच्या गावातील जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आता सन्मानाने अंत्यसंस्कार करता येणार,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
