ठाणे : ठाणे तालुक्यातील मौजे मोठी देसाई येथील एक आदर्श व्यक्तिमत्व दत्तू हेन्द्रया पाटील यांचे रविवार दिनांक २६ एप्रिल 2026 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी अल्प आजाराने दुःखद निधन झाले .
मोठी येथील समशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा प्रमाणात ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
दत्तू हेन्द्रया पाटील हे शेतकरी कुटुंबातील शांत व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व होते . आध्यत्मिक कार्यात ते नेहमीच सक्रिय असत . मध्य रेल्वेची सेवा करून ते निवृत्त झाले होते. सर्वांशी आपुलकीने वागणारे अशी त्यांची ख्याती होती.
कै. दत्तू हेन्द्रया पाटील यांच्या पश्चात पत्नी अनुबाई दत्तू पाटील , 2 मुले, 2 मुली , नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचा दशक्रिया (दहावा ) शुक्रवार दिनांक 5 मे २०२६ रोजी देसाईगाव खाडी, गणेश घाट येथे तर तेरावा विधी (उत्तरकार्य ) शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी मोठी देसाई तालुका जिल्हा ठाणे येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
