डोंबिवली ( शंकर जाधव ) : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट व पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त डोंबिवलीतील रोटरी गार्डन येथे रोटरी बालकट्टा' सुरु करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष रो. डॉ.संदीप घरत, मानद सचिव रो.विनायक आगटे,प्रकल्प संचालक रो.संतोष प्रभूदेसाई,प्रकल्प प्रमुख रो. राकेश मेहता,पै फ्रेंड्स लायब्ररी संचालक पुंडलिक पै, ज्योती दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
लहान मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा एक विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे.'रोटरी बालकट्यावर यायचं.. आपलं आवडत पुस्तकं वाचायचं... मग वाचलेल्या पुस्तकावर आधारीत प्रश्नमजुशेची उत्तरे द्यायची..आणि छान छान पुस्तके बक्षीस म्हणून घ्यायची' असा हा अगडा साधा पण मजेशीर शिक्षणावर आधारित एक प्रकारचा खेळ म्हणा ना..
यावेळी लहान मुलेच नव्हे तर 'केजी ते आजी'असं वातावरण वाटावं असा हा बालकट्टा दिसत आहे.
२ मे व ३ मे रोजी 'बुक झेनिया' हा पै फ्रेंड्स लायब्रररिचा उपक्रम, ९ मे रोजी झुंबा व मनोरंजन ( रो. ओमराज राजन ), आहारतज्ञ तन्वी पटवारी यांचे जंग फूड व इतर सविस्तर माहितीचे व्याख्यान, १० मे रोजी जादूगार डॉ. मनोज केतकर यांचे जादूचे प्रयोग, १६ मे रोजी डॉ. रवींद्र पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवप्रताप यावर व्याख्यान, १७ मे रोजी एसआरपीफ बटा लियन -११ बेळगावचे शस्त्रप्रदर्शन आणि बॅड पथक यांचे वाद्यवृंद सादरीकरण असा कार्यक्रम आहे.
यावेळी पै फ्रेंडस लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै म्हणाले, आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेत आहोत.
'हॅप्पी रिडींग क्लब' वाचकाकरता नवीन उपक्रम...नो मोबाईल..पै फ्रेंड्स लायब्ररिच्या वतीने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्टच्या सहकार्याने रोटरी गार्डन येथे दर रविवारी सकाळी सात ते नऊ यावेळेत पुस्तक वाचन होईल. या उपक्रमात वाचकांनी येथील कोणतेही पुस्तक अथवा वाचकाने त्याच्याकडी पुस्तक आणून येथे दोन वाचावे. मात्र या दोन तासात वाचकांनी आपला मोबाईल बंद ठेवावा. कारण वाचकांची एकाग्रता असावी. या दोन तासात वाचक पुस्तकातील ज्ञान घेतील असा उद्देश आहे. या उपक्रमात लहान मुलांनपासून ते तरुण वर्ग व ज्येष्ठ नागरिक सहभागी होऊ शकतात.
