ठाणे ता ३ मे ( संतोष पडवळ ) : 'Eat Hot, Hit Hard' हे ब्रीदवाक्य घेऊन वडापावला कॉर्पोरेट ओळख देणारा देशातील पहिला नोंदणीकृत स्ट्रीट फूड ब्रँड 'ROKO वडापाव' आता दिवा शहरात अधिकृतपणे दाखल झाला आहे. एका भव्य सोहळ्यात या ब्रँडच्या मुख्य स्टॉलचे उद्घाटन पार पडले असून, आजपासून दिव्यातील तब्बल १० वेगवेगळ्या ठिकाणी हे स्टॉल्स नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा
या उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सुभाष भोईर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना त्यांनी मराठी तरुणांच्या या व्यावसायिक झेपचे स्वागत केले. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी मोठी उपस्थिती लावली होती. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील, ऍड.आदेश भगत, नगरसेविका सौ.स्नेहा अमर पाटील, सौ.अर्चना निलेश पाटील, शिवसेना (उबाठा) ऍड.रोहिदास मुंडे, भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, माजी नगरसेवक हिरा पाटील, अमर पाटील यांच्यासह शहरातील अनेक नामवंत उद्योजक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी बिग बॉस सीझन ६ ची विजेती तन्वी कोलते. तिने या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून 'ROKO' वडापावच्या चवीचा आस्वाद घेतला. तन्वीला पाहण्यासाठी दिवेकरांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे सोहळ्याला एका ग्लॅमरस सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. दिव्यातील १० विविध मोक्याच्या ठिकाणी 'ROKO' चे स्टॉल्स ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहेत. उद्घाटनाच्या निमित्ताने खास 'लकी ड्रॉ' योजना देखील राबवण्यात आली होती.
केवळ १० रुपयांत वडापाव खाऊन ग्राहकांना स्कूटर, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि सायकल यांसारखी लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी देण्यात आली होती.
जल्लोषपूर्ण वातावरणढोल-ताशांचा गजर, भगवा ध्वज आणि फटाक्यांच्या आतषबाजीने हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. हायजिनिक आणि चविष्ट वडापाव ही ओळख असलेल्या 'ROKO' ब्रँडने पहिल्याच दिवशी दिवाकरांच्या जिभेवर आपली मोहोर उमटवली आहे.
