ठाणे ता ३१ मे : दिवा परिसरातून हरवलेली ८ वर्षीय साक्षी विजयकुमार पांडे या हरवलेली मुलीस शोधण्यास दिवा (मुंब्रा) पोलिसांना यश मिळाले आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस आयुक्त प्रियंका डमाळे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस स्टेशनच्या पथकाने गेली ३ ते ४ दिवस अहोरात्र मेहनत घेतली. या शोध मोहीमे दरम्यान दिवा ते बदलापूर परिसरातील १००० हून अधिक CCTV कॅमेरे तपासण्यात आले.
मुलगी हरवल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण दिवा शहरात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिस प्रशासनाने तात्काळ हालचाली करत विशेष पथके तयार केली आणि विविध भागांमध्ये शोधमोहीम राबवली. दिवा शहरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत मुलीचा शोध घेण्यासाठी मदत केली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र धावपळ करत सातत्याने तपास सुरू ठेवला आणि अखेर मुलगी सुखरूप सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
या शोध मोहीमे दरम्यान व.पो.नि. अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक पगार, स.पो.नि. वसंत खतेले, स.पो.नि. कोळेकर, स.पो.नि. केदार, स.पो.नि. सावंत, स.पो.नि. जाधव, स.पो.नि. माने, पोलीस उप निरीक्षक शर्मा मॅडम तसेच दिवा आणि मुंब्रा पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम व नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे एका चिमुकलीला सुरक्षितपणे कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यश आले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे .

